गुंड नगरसेवकाच्या मुलाची तरुणाला मारहाण, डांबून ठेवलं

नागपुरात भाजपचा पदाधिकारी आणि गावगुंड सुमीत ठाकूर याने एका प्राध्यापकाला मारहाण केल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एक भाजपचा स्थानिक नेता अडचणीत आलाय.

Updated: Nov 6, 2015, 09:22 AM IST
गुंड नगरसेवकाच्या मुलाची तरुणाला मारहाण, डांबून ठेवलं title=

अखिलेश हळवे, नागपूर : नागपुरात भाजपचा पदाधिकारी आणि गावगुंड सुमीत ठाकूर याने एका प्राध्यापकाला मारहाण केल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एक भाजपचा स्थानिक नेता अडचणीत आलाय.

अधिक वाचा - मुख्यमंत्र्यांच्या काकूंची व्हॉटसअॅप ग्रुपविरोधात तक्रार

आधी भाजपचा नागपूरचा गावगुंड सुमीत ठाकूर... आणि आता मुन्ना यादव ऊर्फ ओमप्रकाश यादव... रोज घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांनी नागपूर बदनाम झालंय. त्यातच आता हे नागपूरचे भाजपचे स्थानिक नेते शहराच्या या लौकीकात भरच घालतायत. 'वादग्रस्त नगरसेवक' अशी मुन्ना यादव यांची ख्याती... आता ते नव्या वादात सापडले आहेत. 

अधिक वाचा -  नागपुरात वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून पोलीस शिपायाची आत्महत्या

मुन्ना यादवच्या कुटुंबियांनी मारहाण केल्याची तक्रार वस्तीत राहणाऱ्या राहुल बुधबावरे या युवकाने केलीय. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर मुन्ना यादव यांच्या मुलाने आपल्याला मारहाण करून डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आलाय. यात यादव यांचा भाऊ आणि पत्नीही सहभागी असल्याचा आरोप आहे. 

अधिक वाचा -  भाजपच्या माजी महापौर कल्पना पांडे यांची लाचखोरी उघड

मुन्ना यादव नगरसेवक आहेतच पण त्याचबरोबर राज्य बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्षही आहेत. त्यामुळे त्यांना राज्यमंत्र्याचा दर्जाही आहे. आपला या प्रकरणात कोणताही सहभाग नाही, राजकीय ष़डयंत्राने आपल्याला फसवलं जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. 

अधिक वाचा - भाजपचा गुंड पदाधिकारी सुमित ठाकूरला अखेर अटक

पक्ष कार्यकर्त्यांच्या अशा या बेताल वागण्यामुळे मुख्य़मंत्री आणि त्यांचा पक्ष सतत अडचणीत येत आहे. सार्वजनिक जीवनात कसं वागावं याची शाळा आणि मुख्यमंत्र्यांनीच घेण्याची वेळ आलीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.