नवी मुंबई : कल्याण डोंबिवलीत सत्तास्थापनेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ सुरु असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नवी खेळी खेळली आहे. आपल्या एक समर्थकासह १० नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन केलाय.
कल्याण डोंबिवलीत सत्तास्थापनेसाठी शिवसेना आणि भाजप या दोन्ही गटांकडून संख्याबळासाठी गळ टाकले जात आहेत. नगरसेवकांची फोडाफोडी टाळण्यासाठी मनसेनं १० जणांचा गट करून कोकण आयुक्तांना पत्र दिलंय. नऊ नगरसेवक आणि एक अपक्ष समर्थक नगरसेवकासह १० जणांचा असा हा गट मनसेनं स्थापन केलाय.
त्यामुळे मनसे शिवसेनाला मदत करणार की भाजपला याची उत्सुकता अधिकच वाढली आहे. शिवसेनेचे संख्या बळ सर्वाधिक आहे. शिवसेना ५२ आणि भाजप ४२, आणि आता मनसे + अपक्ष १० असे संख्याबळ आहे. काँग्रेस ४, राष्ट्रवादी २ आणि अपक्ष १० अशी संख्या त्यामुळे मनसेला अधिक महत्व आले आहे. बहुमतासाठी शिवसेनेला ९ नगरसेवक कमी पडत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.