पोलिसानं घेतला मॅक्सवेलपेक्षाही जबरदस्त कॅच!

घरगुती वादामुळे प्रचंड संतापलेल्या एका वृद्धाने पुलावरून खाली उडी मारली... पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.. त्या वृद्धाचा जीव वाचला.

Updated: Sep 15, 2015, 09:54 PM IST
पोलिसानं घेतला मॅक्सवेलपेक्षाही जबरदस्त कॅच! title=

कैलास पुरी, पिंपरी-चिंचवड : घरगुती वादामुळे प्रचंड संतापलेल्या एका वृद्धाने पुलावरून खाली उडी मारली... पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.. त्या वृद्धाचा जीव वाचला.

घरगुती वादामुळे 65 वर्षीय बाळासाहेब वाकडकर यांनी संतापाच्या भरात आत्महत्येचा निर्णय घेतला. त्यासाठी ते वाकडच्या पुलावर पोहोचले. तिथून ते उडी मारण्याच्या बेतात असतानाच जवळच असलेल्या पोलीस स्टेशनमधले पोलीस त्यांना पुलाखालून समजावत होते. मात्र, वाकडकर यांनी खाली उडी मारलीच... 

अधिक वाचा - खाक्या वर्दीतली 'माय'! 

ते पाहताच क्षणाचा विलंब न लावता सहाय्यक पोलीस निरिक्षक चिमाजी केंद्रेकर यांनी त्यांना अक्षरशः झेललं. वाकडकर यांच्या जीवावर बेतलेलं केवळ केंद्रेकर यांच्या दक्षतेमुळे पायावर निभावलं. तत्पर पोलीस होते म्हणून वाकडकर आज जीवंत आहेत. सध्या त्यांच्यावर वाकडच्या लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 

 Video - माणसाचे प्राण वाचविण्यासाठी पोलिसाने मारली पुलावरून उडी

क्षणिक रागामुळे अनेक जण असं आत्महत्येचं पाऊल उचलतात. बाळासाहेब वाकडकर यांचं नशीब बलवत्तर म्हणून त्यांचे प्राण वाचले. पण प्रत्येक वेळी वाचवणारा असेलच असं नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.