महाबळेश्वर : सिंचन घोटाळ्याप्रकरणी कुणालाही चौकशीतून सूट मिळणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाबळेश्वरमध्ये बोलताना स्पष्ट केलं.
ज्यावेळी चौकशीची गरज असेल तेव्हा ACB मार्फत संबंधितांना बोलावलं जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार आणि सुनील तटकरे या माजी मंत्र्यांना एसीबीनं प्रश्नावली पाठवलीय.
त्यामुळं त्यांची चौकशीतून सुटका झाल्याचा अर्थ काहींनी काढला होता. त्यावरून भाजप सरकारवर टीकेची झोड उठली होती. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या स्पष्टीकरणामुळं चौकशीच्या ससेमि-यातून अजित पवार आणि तटकरेंना दिलासा मिळणार नसल्याचं स्पष्ट झालंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.