ओला-उबेर टॅक्सीला कल्याणमध्ये नो एन्ट्री

प्रवाशांना स्वस्त आणि दर्जेदार सेवा पुरवणा-या ओला, उबेर, मेरु, टॅब या टॅक्सी सेवेचा धसका आता कल्याणमधील रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी घेतला आहे. 

Updated: Jul 31, 2016, 09:01 PM IST
ओला-उबेर टॅक्सीला कल्याणमध्ये नो एन्ट्री  title=

कल्याण : प्रवाशांना स्वस्त आणि दर्जेदार सेवा पुरवणा-या ओला, उबेर, मेरु, टॅब या टॅक्सी सेवेचा धसका आता कल्याणमधील रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी घेतला आहे. त्यामुळे या गाड्यांना या संघटनांनी स्वयंघोषित प्रवेशबंदी जाहीर केली आहे.

याबाबत विविध फलक कल्याणमध्ये पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या आदेशावरुन असं या फलकावर नमूद करण्यात आलं आहे, त्यामुळे प्रवेशबंदीचा हा आदेश परिवहन विभागाचा असल्याचा संभ्रम निर्माण होत आहे. 

खाजगी टॅक्सी सेवांना स्थानक परिसरात फक्त पार्किंग करण्यास परवानगी नाही असे आदेश असताना रिक्षा संघटना परस्परच स्वतः आरटीओच्या नावानं बोर्ड लावत असल्याचं उपप्रादेशिक अधिकारी यांनी स्पष्ट केलं आहे.