कऱ्हाड : आतापर्यंत नितीन गडकरी भ्रष्टाचारी आहेत, असं वाटत होतं, मात्र आता त्यांची बुद्धी भ्रष्ट झाल्याचंही लक्षात येतंय, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तोफ डागलीये.
चव्हाण यांनी भाजपमध्ये येण्यासाठी आपल्याला फोन केला होता, असा गौप्यस्फोट गडकरींनी कराडमध्ये झालेल्या सभेत केला होता. त्याला चव्हाणांनी आज सडेतोड प्रत्युत्तर दिलं.
पृथ्वीराज चव्हाण हे सरपंच व्हायच्याही लायकीचे नाहीत, अशी घणाघाती टीका, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी केली होती. पिंपरी-चिंचवडमध्ये ही टीका केली होती.
पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीवरून महाराष्ट्राचं वाटोळ करायला आले आहेत. शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिलेले ‘लकवा छाप’ ही उपाधी योग्यच आहे. फाईल्सवर सह्या न करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या हाताला, आचारसंहितेपूर्वी कसा काय वेग आला? पृथ्वीराज हे मुख्यमंत्री नव्हे, सरपंच व्हायच्या लायकीचे नाहीत, असा घणाघात गडकरींनी केला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.