सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गमध्ये हिंसक डंपर आंदोलनप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यासह 25 जणांना अटक करण्यात आलीय. नितेश राणे यांना रविवारी ओरोस कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
मनमानीपणे रॉयल्टी आकारणीविरोधात डंपर आंदोलन पुकारण्यात आलं होतं. जवळपास एक हजार डंपर जिल्हाधिकारी कार्यालयापुढं उभे करुन या आंदोलनाला सुरुवात झाली होती.
यानंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी आंदोलकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांना थोपवण्यासाठी यावेळी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागलाय..