पुणे : निगडी ते स्वारगेट मेट्रो सेवा सुरु करण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मेट्रो प्रकल्पाला मान्यता देण्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी दिली.
मुंबईपाठोपाठच आता पुण्यातही मेट्रो रेल्वे धावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निगडी ते स्वारगेट असा पुणे मेट्रोचा पहिला टप्पा आहे. पुण्यातील प्रचंड वाढलेल्या रहदारीवर दीर्घकालीन तोडगा म्हणून मेट्रो रेल्वेची मागणी बऱ्याच काळापासून होत होती. आज शनिवारी या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक झाली असून पुण्यातल्या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी देण्यात आल्याची घोषणा फडणवीस यांनी केली.
तसेच दुस-या टप्प्याच्या मेट्रोच्या शक्यतेचा विचार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यात येणार आहे. या समितीने एका महिण्यायात अहवाल सादर करायचा असून त्याच्यानंतरच दुस-या टप्प्याच्या मेट्रोचा विचार करण्यात येईल आणि त्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल , असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.