राज्यात येणार नवं सिंचन धोरण!

राज्यात सिंचन वितरण प्रणालीमध्ये नवं धोरण आणलं जाणार आहे. आज राज्याच्या कॅबिनेटमध्ये यावर चर्चा होणार आहे.

Updated: May 17, 2016, 04:56 PM IST
राज्यात येणार नवं सिंचन धोरण! title=

मुंबई : राज्यात सिंचन वितरण प्रणालीमध्ये नवं धोरण आणलं जाणार आहे. आज राज्याच्या कॅबिनेटमध्ये यावर चर्चा होणार आहे.

यापुढे एखाद्या धरण, तलावामधून नवं सिंचन वितरण हे कालव्याद्वारे नव्हे तर पाईप लाईनमधून केलं जाणार आहे.  

हा नियम नव्या सिंचन वितरण प्रणालीला मान्यता देतांना अंमलात आणला जाणार आहे. राज्यात धरण किंवा तलावातलं पाणी कालव्यामधून दूरवर नेलं जातं आणि सिंचनासाठी वापरलं जातं. मात्र, यामध्ये कालवा फुटल्याने किंवा गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी फुकट जातं.

मुख्य म्हणजे अवैधरित्या मोठ्या प्रमाणात पंपाद्वारे पाण्याची चोरी केली जाते. त्यामुळे कालवा खर्चिक ठरतो. तसंच बाष्पीभवनामधूनही काही प्रमाणात पाणी वाया जातं.

म्हणूनच या समस्यांवर तोडगा म्हणून राज्य सरकार नवं सिंचन वितरण धोरण निश्चित करणार आहे.