उमरी नगरपरिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा

राज्यातील नगरपालिकांच्या तिस-या टप्प्यातील मराठवाडा आणि विदर्भातील 20 नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच मतमोजणी होतेय.

Updated: Dec 19, 2016, 11:16 AM IST
उमरी नगरपरिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा title=

नांदेड : राज्यातील नगरपालिकांच्या तिस-या टप्प्यातील मराठवाडा आणि विदर्भातील 20 नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच मतमोजणी होतेय.

नांदेडमधील 9 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतमोजणी केली जातेय. नांदेडमधील उमरी नगरपरिषदेवर राष्ट्रवादीने एकहाती वर्चस्व मिळवलेय.

उमरी नगरपरिषदेतील  सर्व 17 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाल्याने या नगरपरिषदेत राष्ट्रवादीला यश मिळालेय. उमरीच्या नगराध्यक्षपदी अनुराधा खांडरे विजयी झाल्यात.