राष्ट्रवादीचा आमदार रमेश कदमला पुण्याच्या हॉटेलातून अटक

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील भ्रष्टाचार प्रकरणी आमदार रमेश कदम यांना पुण्यातील एका हॉटेलमधून अटक करण्यात आलीय.

Updated: Aug 17, 2015, 01:09 PM IST
राष्ट्रवादीचा आमदार रमेश कदमला पुण्याच्या हॉटेलातून अटक  title=

पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील भ्रष्टाचार प्रकरणी आमदार रमेश कदम यांना पुण्यातील एका हॉटेलमधून अटक करण्यात आलीय.

कदम यांना पुण्यातील नगर रस्त्यावरील ग्रँड हयात हॉटेलमधून अटक करण्यात आलीय. त्यांना सीआयडीचे पथक नवी मुंबईत घेऊन आलंय. 

अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष आमदार रमेश कदम यांच्याविरोधात दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा तपास सीआयडी करतंय. कदम महामंडळाचे अध्यक्ष असताना भ्रष्टाचार झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. महामंडळाचे हजारो कोटी रुपये स्वत:च्या खात्यावर जमा केल्याचा आरोप कदम यांच्यावर आहे... इतकंच नाही तर काही राजकीय व्यक्‍तींना देखील महामंडळाचे पैसे दिल्याचा आरोपही कदमांवर आहे.

अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील भ्रष्टाचार प्रकरणी सीआयडीच्या प्राथमिक अहवालात नेमकं काय आढळलंय, त्यावर एक नजर टाकुयात... 

  • जोशाबा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्थेला ४१ कोटी ३७ लाख रू. दिले

  • मैत्री शुगर प्रा. लिमिटेडला ३० कोटी रूपयाचे वाटप

  • महालक्ष्मी दूध उत्पादक सहकारी संस्थेला ५ कोटी रूपये

  • कांदिवलीच्या रहेजा सोसायटीमधे २.२५ कोटींचा फ्लॅट घेतला

  • औरंगाबादला ११ कोटी रूपयांना ६२ गुंठे जागा विकत घेतली

  • संतोष सिव्हिल सर्व्हिसेस कंपनीला १० कोटी रू. दिले

  • रमेश कदमने स्वतःच्या खात्यावर ५ कोटी रू. ट्रान्सफर केले

  • महामंडळाच्या पैशातून ९ कोटी ३४ लाख रूपयात १६ गाड्या घेतल्या

  • त्यात ७१ लाख रुपयांच्या २ मर्सिडीज, ६२ लाखांच्या एका ऑडीचा समावेश

  • गाड्यांसाठी २३ लोकांच्या नावे कर्ज दाखवलं

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.