नवी मुंबई : नवी मुंबईत राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेवार सुधाकर सोनावणे नवे महापौर झालेत.
सोनावणेंना 67 मतं मिळाली तर महापौरपदाचे शिवसेनेचे उमेदवार संजू वाडे यांच्या पारड्यात 44 मतं मिळाली.
तर काँग्रेसचे अविनाश लाड यांची उपमहापौरपदी वर्णी लागलीय. त्यांना ६७ मतं पडली तर युतीच्या उज्ज्वला झंजाड यांना ४४ मतं पडली.
आपल्यावरची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडू असं आश्वासन नवनिर्वाचीत महापौर सुधाकर सोनावणे यांनी यावेळी दिलं.
तर चमत्कारांचा दावा करणारे विरोधक तोंडघशी पडल्याचा टोला, राष्ट्रवादीचे नेते संजीव नाईक यांनी या विजयानंतर दिली. शेवटच्या टप्प्यातही सेनेच्या एकनाथ शिंदेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत, असं वक्तव्य करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. शिवसेना शेवटपर्यंत नवी मुंबईच्या महापौर पदासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं होतं. पण, शिवसेनेच्या या प्रयत्नांना अपयश आलं असंच आता म्हणावं लागेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.