नांदेडमध्ये २५ लाखांचे दागिने लुटले

येथील गजबजलेल्या वझिराबाद भागातील पायल ज्वेलरी शॉपमध्ये धाडसी लुटीचा प्रकार घडला आहे. २५ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लुटल्याचा प्रकार घडला.

Updated: May 9, 2015, 01:01 PM IST
नांदेडमध्ये २५ लाखांचे दागिने लुटले title=

नांदेड : येथील गजबजलेल्या वझिराबाद भागातील पायल ज्वेलरी शॉपमध्ये धाडसी लुटीचा प्रकार घडला आहे. २५ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लुटल्याचा प्रकार घडला.

लुटारूंनी बंदुकीचा धाक दाखवून दुकानातून सुमारे २५ लाख किमतीचे जवळपास एक किलो सोने लुटल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दुचाकीवरून आलेल्या लुटारूंनी हेल्मेट घातलं होते. 

अत्यंत सिनेस्टाईल पद्धतीने घालण्यात आलेल्या या दरोड्यात लुटारूंनी हवेत गोळीबर केला आणि सोबत आणलेल्या पोत्यांमध्ये सोन्याचे दागिने भरून पोबारा केला. लुटीचा हा सर्व थरारक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला.

 पाहा व्हिडिओ

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.