सहकार राज्य मंत्री दादा भुसे यांच्या मतदार संघात २ कोटींना गंडा

राज्यात सर्वच जिल्ह्यात ठेविदाराना बुडविण्याचा कार्यक्रम जळगाव जिल्ह्यातून होतोय. आता याचा फटका सहकार राज्य मंत्री दादा भुसे यांनाही बसला आहे. त्याच्या मतदार संघातील त्रेसष्ट ठेवीदाराना दोन कोटी रुपयांत बुडविण्यात आल्याने सहकार खाते अडचनीत आले आहे.

Updated: Apr 14, 2015, 05:00 PM IST
सहकार राज्य मंत्री दादा भुसे यांच्या मतदार संघात २ कोटींना गंडा title=

नाशिक : राज्यात सर्वच जिल्ह्यात ठेविदाराना बुडविण्याचा कार्यक्रम जळगाव जिल्ह्यातून होतोय. आता याचा फटका सहकार राज्य मंत्री दादा भुसे यांनाही बसला आहे. त्याच्या मतदार संघातील त्रेसष्ट ठेवीदाराना दोन कोटी रुपयांत बुडविण्यात आल्याने सहकार खाते अडचनीत आले आहे.

जळगावातील अनेक पतसंस्थांनी घोटाळा करून चार हजार कोटी रुपयांना फसवले आहे. बढे पतसंस्था, बोरोले पतसंस्था, तापी पतसंस्था, श्रीराम बँक अशा अनेक पतसंस्थांनी या विभागातील हजारो सर्वसामान्य नागरिकांना कोट्यवधी रुपयांना गंडवलंय. 

सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्याकडून या सर्व ठेवीदारांना आशा निर्माण झाल्या होत्या.. मात्र आता तर मालेगावात जळगावच्या बी.एच.आर रायसोनी मल्टीस्टेट पतसंस्थेने आता थेट सहकार राज्य मंत्र्यांच्या प्रतिष्ठेला आव्हान दिलंय.

या बँकांनी उत्तर महाराष्ट्रातल्या पाच जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान केलंय.. राज्यात तीस हजार कोटी रुपयांना फसवलंय... असं असलं तरी सहकार विभाग मात्र ढिम्मच आहे. 

कष्टानं कमावलेले पैसे युतीच्या सरकारनं तरी परत मिळवून द्यावेत अशी माफक अपेक्षा ठेवीदारांची आहे. आता लवकरात लवकर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.