रत्नागिरी : मंडणगड तालुक्यातलं आंबवडे गाव. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव. याच ठिकाणी बाबासाहेबांचं एक छोटंसं स्मारक उभारुन त्यांच्या आठवणी जपण्याचा प्रयत्न केला गेलाय.
इथं बाबासाहेबांच्या अस्थिही ठेवण्यात आल्यात. दरवर्षी जवळपास तीन लाख लोक या स्मारकाला भेट देतात. मात्र हे स्मारक आजही विकासापासून कोसो दूर आहे. खड्डेमय रस्ते आणि सोयीसुविधांचा अभाव यामुळं इथं येणा-या भीम अनुयायी आणि पर्यटकांचा हिरमोड होतो.
या गावाला ३ फेब्रुवारी२००९ पर्यटनस्थळाचा दर्जा प्राप्त झाला. गावात ५ कोटींची शिल्पसृष्टी उभारण्याची घोषणा तत्कालीन पर्यटनमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरेंनी केली.. ग्रामस्थांनी त्यासाठी ३६गुंटे जमीन बक्षीस पात्राने दिली.. मात्र गेल्या सहा वर्षात ना दगड या जागेवर पडला ना शिल्पसृष्टी उभी राहिली...पर्यटन भवनाचीही अवस्थाही तशीच.. अधिकारी आणि राजकारणी निव्वळ आश्वासनं देतायत...
इंदू मिल इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं राष्ट्रीय स्मारक उभारण्यावरुन सर्वच नेतेमंडळी स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतात.. मात्र आंबवडे गावात असलेल्या दुर्लक्षित स्मारकाकडे यापैकी कोणत्याही नेत्याचं लक्ष जाऊ नये याहून मोठं दुर्दैव ते कोणतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.