नाशिक : नोटबंदीच्या निर्णयानंतर, जिल्हा बँकांना 500 आणि हजारांच्या नोटा न स्वीकारण्याचे आदेश असतानाही जिल्हा बँकांमध्ये या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत. नाशिकच्या नाशिक जिल्हा बँकेवर लाचलुचपत आणि आयकर विभागानं धा़ड टाकली आहे.
या धाडी दरम्यान जमा झालेल्या पाचशे हजार रुपयांच्या नोटांची चौकशी सुरू झाली असून जिल्ह्यातील काही सहकारी बॅंकांची चौकशी करण्यात येणार आहे. तर मोठ्या रकमेचे डिपॉजीट करणा-यांना नोटीसा बजावण्यास सुरूवात झाली आहे. विशेष म्हणजे, जिल्हा बँकांना पाचशे आणि हजारांच्या नोटा स्वीकारण्यास बंदी असतानाही जिल्हा बँकेत अशारितीने जुन्या नोटा कशा जमा झाल्या हा खरा प्रश्न आहे.