अकोटमध्ये शेतात वाघ घुसल्यानं खळबळ

अकोला जिल्ह्यामधल्या अकोट तालुक्यातल्या रामपूर धारुळ गावात बुधवारी वाघ दिसल्यानं खळबळ माजली आहे.

Updated: Dec 1, 2016, 09:37 AM IST
अकोटमध्ये शेतात वाघ घुसल्यानं खळबळ  title=

अकोट : अकोला जिल्ह्यामधल्या अकोट तालुक्यातल्या रामपूर धारुळ गावात बुधवारी वाघ दिसल्यानं खळबळ माजली आहे. काल सकाळी 10 च्या सुमारास गावकरी शेतात जात असताना, गावातल्या वन विभागाच्या हद्दीत हा वाघ दिसला. याची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी तिथे पोहचले. मात्र तोपर्यंत वाघ जंगलात निघून गेला. 

पुन्हा दुपारी दोनच्या सुमारास वनाधिकारी सुनील वाकोडे यांना दिसला त्यांनी आपल्या मोबाईल मध्ये त्याचे चित्रण करीत असतांना वाघ तेथून थेट जंगलात पळाला. 14 नोव्हेंबरला अकोटच्या मक्रमपूर आणि शिवपूर भागात एक वाघिण आपल्या दोन बछडया सोबत दिसून आली होती.