अरे हे काय? आता राणेंनी केली मुख्यमंत्र्यांची स्तुती!

कोल्हापुरात आज अखिल भारतीय मराठा महासंघाचं राष्ट्रीय अधिवेशन झालं. य़ा अधिवेशनात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उद्योगमंत्री नारायण राणे आणि विरोधीपक्ष नेते विनोद तावडे उपस्थित होते. नारायण राणे गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत आहेत. मात्र आज हे दोन नेते शेजारी शेजारी बसले होते. या कार्यक्रमात नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांची स्तुती केली. 

Updated: Aug 3, 2014, 10:00 PM IST
अरे हे काय? आता राणेंनी केली मुख्यमंत्र्यांची स्तुती! title=

कोल्हापूर : कोल्हापुरात आज अखिल भारतीय मराठा महासंघाचं राष्ट्रीय अधिवेशन झालं. य़ा अधिवेशनात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उद्योगमंत्री नारायण राणे आणि विरोधीपक्ष नेते विनोद तावडे उपस्थित होते. नारायण राणे गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत आहेत. मात्र आज हे दोन नेते शेजारी शेजारी बसले होते. या कार्यक्रमात नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांची स्तुती केली. 

मुख्यमंत्र्यांनी आरक्षणासंदर्भात स्थापन केलेल्या समितीचं अध्यक्षपद राणेंना दिल्याबद्दल राणेंनी चक्क मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले.  त्यामुळं राणेंची नाराजी दूर झाली की काय? की आता राणेंना काँग्रेसशिवाय दुसरा पर्याय नाही असा प्रश्न उपस्थित होतोय.

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा उपयोग नोकऱ्यांपेक्षा शिक्षणासाठी करण्याचा सल्ला दिला. यालाही नारायण राणेंनी दुजारा दिला आणि समितीचा अध्यक्ष केल्यामुळंच मराठा आरक्षणाचा निर्णय घेऊ शकलो, असं म्हणत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांवर सातत्यानं टीका करणारे राणे आज मुख्य़मंत्र्यांवर स्तुतिसुमनं उधळताना दिसल्यामुळं राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे.  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.