मीरारोडमध्ये चोरांनी मारला टोमॅटोंवर डल्ला!

 कुणी पैसे चोरतं.. कुणी दागिने चोरतं.. मात्र मुंबईत चोरांनी चक्क टोमॅटोंवर डल्ला मारलाय.. सध्या टोमॅटोचे भाव वधारल्यानं मीरारोडच्या काशिमीरा भाजीमार्केटमध्ये एका भाजी विक्रेत्याचे 40 हजार रुपयांचे टोमॅटो चोरांनी पळवले..

Updated: Aug 3, 2014, 09:38 PM IST
मीरारोडमध्ये चोरांनी मारला टोमॅटोंवर डल्ला! title=

मीरारोड:  कुणी पैसे चोरतं.. कुणी दागिने चोरतं.. मात्र मुंबईत चोरांनी चक्क टोमॅटोंवर डल्ला मारलाय.. सध्या टोमॅटोचे भाव वधारल्यानं मीरारोडच्या काशिमीरा भाजीमार्केटमध्ये एका भाजी विक्रेत्याचे 40 हजार रुपयांचे टोमॅटो चोरांनी पळवले..

काशिमीरा येथील भाजी मार्केटमध्ये अशोक प्रजापती याचा भाजीचा ठेला आहे.. काल रात्री अशोकनं नाशिक वरून आलेले 26 कारेट टोमॅटो नेहमी प्रमाणे आपल्या दुकानात उतरवले होते. मात्र सकाळी ४ वाजता तो दुसरा भाजीचा माल उतरवण्यासाठी आला तेव्हा दुकानातून टोमॅटो चोरल्याचं त्याच्या लक्षात आलं. 

याबाबत त्यानं मीरारोड काशिमीरा पोलिसांनी या अनोख्या चोरीची तक्रार दाखल . मात्र अशी केस पहिल्यांदाच पहिली असं पोलिसांनी सांगितले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.