वेंगुर्ला : (सिंधुदुर्ग ) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांची सरपंच होण्याचीही लायकी नाही, उद्धव ठाकरे जितक्या वेळा टीका करतील. तितक्या वेळेस आपण उत्तर देऊ असं नारायण राणेंनी म्हटलंय.
तसेच उद्धवजी, चांगलं काम करणाऱ्यांना आपोआप शांती मिळते, असं राणेंनी म्हटलंय. कारण उद्धव ठाकरे यांनी काल नारायण राणे यांचं नाव न घेता, त्या माणसाला एखाद्या पक्षात शांती लाभो, अशी टीका केली होती.
नारायण राणे यांनी दीपक केसरकर यांचा चांगलाच समाचार घेतलाय. तू एका स्मगलरचा पोरगा आहेस, कधीकाळी तिकीट मागायला दारावर यायचा, यांना फोन करा, त्यांना फोन करा म्हणायचा, माझ्या जीवावर आमदार झालाय, आता निवडून तर दाखवं, असं नारायण राणेंनी म्हटलंय.
माझ्यावर प्रेम करणाऱ्यांचा मी अत्यंत ऋणी आहे. तसेच आपण सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहोत, पण आपण पक्षात कायम राहू असं नारायण राणे यांनी स्पष्ट केलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.