'नकोशी'ला आईनंच दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकलं

मुलगी नको म्हणून आईनंच तिला दुसऱ्या माळ्यावरून फेकल्याने बाळाचा मृत्यू झालाय. पिंपरीतमध्ये ही धक्कादायक घटना घडलीय. 

Updated: Jun 1, 2015, 05:32 PM IST
'नकोशी'ला आईनंच दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकलं title=

पुणे : मुलगी नको म्हणून आईनंच तिला दुसऱ्या माळ्यावरून फेकल्याने बाळाचा मृत्यू झालाय. पिंपरीतमध्ये ही धक्कादायक घटना घडलीय. 

नवरा-बायकोच्या भांडणानंतर आईनं दोन महिन्यांच्या बालिकेला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकलंय. सोमवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडलीय. मैत्री पाटकर असं या दुर्दैवी मुलीचं नावं… 

सुषमा पाटकर आणि तिचा पती समीर यांच कडाक्याचं भांडण झालं. त्यात संतापाच्या भरात सुषमा यांनी मुलीला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं. मैत्रिला तातडीनं वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तोवर तिचा दुर्दैवी अंत झाला होता.

या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून सुषमा पाटकर हिला पोलिसांनी अटक केली आहे. निगडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आईनंच आपल्या चिमुरडीचा जीव घेतल्यानं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येतेय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.