नागपूर : आमदार निवासात घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. या घटनेनंतर प्रशासनानं आमदार निवासासाठी नवे नियम तयार केले आहेत. तसेच आरोपी मनोज भगतला रुम देणा-या रामकृष्ण राऊत या कक्ष सेवकाची रविभवन इथं तातडीनं बदली करण्यात आली आहे.
यापुढे आमदार निवासात रुम देताना ओळखपत्र सक्तीचं करण्यात आलं आहे. शिवाय शाखा अभियंत्याला दररोज नोंदवहीमधील रुम आरक्षणाची नवे आणि तेच लोक प्रत्यक्ष रुममध्ये राहतात का याची पहाणी करावी लागणार आहे. शिवाय उपविभागीय अभियंत्यालाही आठवड्यातून दोनदा रुम आरक्षणाच्या नोंदवहीची प्रत्यक्ष पहाणी करवी लागणार आहे.