लज्जास्पद व्हिडिओ अपघातातील जखमींना मदत सोडून मोबाईल शुटिंग

मुंबईतल्या लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या भावेश नकातेच्या व्हिडिओमुळे एक नवीच चर्चा सुरू झालीये...

Updated: Dec 3, 2015, 01:08 PM IST

नागपूर : मुंबईतल्या लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या भावेश नकातेच्या व्हिडिओमुळे एक नवीच चर्चा सुरू झालीये... अडचणीत सापडलेल्यांना मदत करण्याऐवजी त्याचं व्हिडिओ चित्रीकरण करण्याचं फॅड... नागपूरमध्ये अशीच घटना समोर आलीये...

नागपूरमध्ये काल एक अपघात झाला... एका डंपरनं ऑटो रिक्षाला धडक दिली... यात एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला तर चौघं जण जखमी झाले... मात्र यातल्या जखमींना मदत करण्याऐवजी तिथं जमलेल्या लोकांनी व्हिडिओ चित्रीकरण करणंच पसंत केलं... 

गंभीर जखमी झालेली एक महिला अक्षरशः विव्हळत होती... जमाव मात्र या वेदनेचं शूटिंग करण्यातच मग्न राहिल्याचं दिसलं... आपल्या समाजाची भावना किती बोथट झालीये, याचीच प्रचिती देणारी ही घटना आहे... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.