जमिनीत पुरण्याआधी आणि पुरल्यानंतरही...!

एका ट्रॅक्टर मालकाने आपलं ट्रॅक्टर चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांकडे केली. बालाजी बानगुडे यांनी आपला ट्रॅक्टर शोधून त्या असा तगादा पोलिसांमागे लावला. या ट्रॅक्टरचा विमा काढण्यात आला होता.

Updated: Dec 3, 2015, 12:20 AM IST
जमिनीत पुरण्याआधी आणि पुरल्यानंतरही...! title=

उस्मानाबाद : एका ट्रॅक्टर मालकाने आपलं ट्रॅक्टर चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांकडे केली. बालाजी बानगुडे यांनी आपला ट्रॅक्टर शोधून द्या, असा तगादा पोलिसांमागे लावला. चोरीला गेेलेल्या ट्रॅक्टरचा विमा काढण्यात आला होता.

पोलिसांनी ट्रॅक्टरचा शोध घेण्यास सुरूवात केली, नेमका कुठून ट्रॅक्टर चोरीला गेला, असं पोलिसांनी विचारल्यावर, मालक बालाजी बानगुडे यांनी ट्रॅक्टर ठेवला होता, ती जागा दाखवली, तेव्हा पोलिस थेट त्या जागी  दाखल झाले. पंचनामा करण्याची सुरूवात करतांना त्यांना मातीत तुरखाट्याच्या काड्या दिसल्या, त्या त्यांनी उचकटल्या तेव्हा त्याखाली पत्रा लावण्यात आला होता. आणि या पत्राखाली दडवलं होता अख्खा ट्रॅक्टर.

विम्याची रक्कम मिळावी म्हणून या पठ्ठ्याने ट्रॅक्टरच जमिनीत खोल खड्डा खणून पुरला होता, बानगुडे सध्या फरार आहेत. अखेर जेसीबी कंपनीच्या मशिनने ही माती बाहेर काढून, खड्ड्यातून ट्रॅक्टर बाहेर काढण्यात आला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.