नागपूर : नागपूर जेल प्रशासन काय करतंय? असा प्रश्न हा व्हिडिओ पाहून आपल्याला पडेल. नुकतेच नागपूर जेल तोडून ५ कुख्यात कैदी फरार झाल्यानं तुरूंग प्रशासनाच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित झालं असतांनाच कैंद्याकडून २६ मोबाईल आज जप्त करण्यात आले आहेत.
एक व्हिडिओ जेलमधील कैद्यानंच आपल्या मोबाईलमध्ये काढला. हा व्हिडिओ झी मीडियाच्या हाती लागलाय. यात नागपूरच्या जेलमधील कैंद्याजवळ सर्रास मोबाईल असल्याचं आढळून आलंय. तसंच काही कैदी पत्ते खेळतांना आणि सिगारेट पितांना दिसतायेत.
झी मीडियाच्या बातमीनंतर जेल प्रशासनानं सर्व कैद्यांची झडती घेतलीय आणि त्यांच्याकडून तबब्ल २६ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
पाहा हा धक्कादायक व्हिडिओ -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.