मराठा आरक्षणाच्या श्रेयावरून मुंडे आणि तावडे यांच्यात जोरदार खडाजंगी

मराठा आरक्षणाचं श्रेय घेण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान सुरु झाल्याची पाहायला मिळतंय. मराठा आरक्षणाचा प्रस्ताव विधान परिषदेत कोण मांडणार यावरुन विनोद तावडे आणि विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.

Updated: Dec 8, 2016, 04:06 PM IST
मराठा आरक्षणाच्या श्रेयावरून मुंडे आणि तावडे यांच्यात जोरदार खडाजंगी title=

नागपूर : मराठा आरक्षणाचं श्रेय घेण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान सुरु झाल्याची पाहायला मिळतंय. मराठा आरक्षणाचा प्रस्ताव विधान परिषदेत कोण मांडणार यावरुन विनोद तावडे आणि विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.

मराठा आरक्षणाच्या प्रस्तावाबाबत विधानपरिषद सभापतींच्या दालनात ही बैठक झाली. तिथे विनोद तावडे आणि धनंजय मुंडे यांच्यात हा वाद झाला. अखेर या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांना मध्यस्थी करावी लागली. एकंदरीत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात मराठा आरक्षणाच्या श्रेयवादावरुन रस्सीखेच सुरु झाल्याचं दिसून येत आहे.