मुंबई : सर्वसामान्य आणि सेलिब्रेटींप्रमाणे नेतेमंडळीही गणेशचरणी लीन झाले आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्नी सत्त्वशीला चव्हाण यांच्यासह वर्षावर गणपतीची प्रतिष्ठापना केली.
यावेळी त्यांनी राज्यातील सर्व जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. राज्याची प्रगती होऊन, शिक्षण, आरोग्य आणि बेरोजगारीसारखे प्रश्न सुटावेत, असं साकडं मुख्यमंत्र्यांनी घातलं.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि ग्रामीण विकासमंत्री नितीन गडकरींच्या नागपूरच्या घरीही लाडक्या गणरायाचं आगमन झालं. गणरायाच्या आशीर्वादानं राज्यात भरपूर पाऊस बरसणार आणि दुष्काळसदृश्य परिस्थिती लवकरच दूर होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवसेना नेते मनोहर जोशींच्या घरीही बाप्पा विराजमान झाला. अनेक वर्षांपासून मनोहर जोशींच्या घरी बाप्पाचं आगमन होतं.
सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हेसुद्धा बाप्पा चरणी लीन झालेत. मुंबईतल्या अंजीरवाडी गणेशोत्सव मंडळात जाऊन भुजबळांनी गणरायाची सपत्निक पूजा केली. राज्यावरचा कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ आणि वीजेचं संकट दूर कर, असं साकडं गणरायाला घातल्याचं भुजबळांनी यावेळी सांगितलं. तसंच बिहार, कर्नाटकमधील पोटनिवडणुकांचे निकाल पाहता राज्यात आघाडी सरकार येईल असा विश्वासही भुजबळांनी व्यक्त केलाय.
माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्याही घरी गणराया विराजमान झालेत. शिंदे यांनी आपल्या घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केलीय.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि ग्रामीण विकासमंत्री नितीन गडकरींच्या नागपूरच्या घरीही गणरायाचं आगमन झालं. गडकरींनी त्यांच्या कुटुंबीयांसोबत गणरायाची पूजा करून प्राणप्रतिष्ठा केली. गणरायाच्या आशीर्वादानं राज्यात भरपूर पाऊस बरसणार आणि दुष्काळसदृश्य परिस्थिती लवकरच दूर होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.