पुणे : भूमाता ब्रिगेडच्या भूमिकेला मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिलाय.
शनीशिंगणापुरातील शनीच्या चौथ-यावर महिलांना प्रवेश मिळण्यासाठी आंदोलन करणा-या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात भेट घेतली.
जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक,नगर यांना सुचना दिल्या आहेत की संघर्ष टाळून संवाद प्रस्तापित करावा. समाजातील अग्रजांनी त्यामध्ये पुढाकार घ्यावा
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 26, 2016
ईश्वराच्या दर्शनासाठी भेदभाव हि आमची संस्कृती नाही. मंदीर प्रशासनाने पुढाकार घेवून चर्चेच्या माध्यमातून असे प्रश्न सोडविले पाहिजेत.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 26, 2016
भूमाता ब्रिगेडच्या भूमिकेला मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिलाय. मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी याच अर्थाचं ट्विटदेखील केलं होतं.