खासदारांनी लिहिला एलएलबी परीक्षेसाठी पेपर

आता खासदार धोत्रेसारखं 'विद्यार्थी' राहण्याचं प्रत्येक राजकीय कार्यकर्त्यांनं ठरवलं. तर या क्षेत्रातील बौद्धीक दुष्काळ नक्कीच संपू शकेल. 

Updated: May 22, 2017, 09:39 AM IST
खासदारांनी लिहिला एलएलबी परीक्षेसाठी पेपर title=

अकोला : मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थी असतो असं म्हटलं जातं. अकोल्याचे भाजप खासदार संजय धोत्रेंनी हाच समज खरा करून दाखवला आहे. त्यांनी एलएलबीच्या चौथ्या सत्राचा शेवटचा पेपर दिलाय. 

संजय धोत्रे 2014मध्ये अकोला लोकसभा मतदार संघातून तिस-यांदा विक्रमी मतांनी निवडून आले. मात्र, राजकारणातील धावपळीतही त्यांनी त्यांच्यातला विद्यार्थी नेहमीच जागा ठेवलाय. याचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी होईल असं खासदार धोत्रेंना वाटतंय. 

आता खासदार धोत्रेसारखं 'विद्यार्थी' राहण्याचं प्रत्येक राजकीय कार्यकर्त्यांनं ठरवलं. तर या क्षेत्रातील बौद्धीक दुष्काळ नक्कीच संपू शकेल.