अमरावती : घरात एक मुलगी असताना दुसरी मुलगी झाल्याने रागाच्या भरात आईनेच स्वताच्या एका महिन्याच्या चिमुकलीला घरात असेल्या पेटत्या चुलीत जाळण्याची घटना अमरावती जिल्ह्यात परतवाडाजवळ असेल्या गौरखेडा कुंभी येथे उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहराच्या ४ किलो मीटर अंतरावर कुंभी गाव आहे. या गावात एक महिन्या आगोदरच वाकोडे कुटुंबात दुसरी पण मुलगीच जन्माला आली. या कुटुंबाची बेताची परिस्थिती असताना घरात आधीच एक ३ वर्षाची मुलगी असताना दुसरी मुलगी झाली आता कसा कराव असा प्रश्न निशाणीच्या आईला(निकिता वाकोडे ) पडला.
काल संध्याकाळी निशाणी रडत असताना रागाच्या भरात आई (निकिता वाकोडे )ने निशाणीला घराच्या चुली मध्ये टाकून जाळून टाकले. यात १ महिन्याची निशाणीचे तोंड जळाले व त्याचा जागीच मृत्यू झाला. जळालेली निशाणीला कुंभीनजीकच्या बिच्छन नदी पात्रात नेऊन तिचा मृतदेह एका खोक्यात ठेवून खताचे ढिगार्यानजीक फेकण्यात आला. याबाबत गावातील एका व्यक्तीला या तान्ह्या मुलीचे प्रेत दिसले आणि त्या व्यक्तीने परतवाडा पोलिसांनी तक्रार दाखल केली हा प्रकार उघडीस आला. या मध्ये आई निकिता वाकोडे ला अटक करण्यात आली आहे.