राज्यातली 300 हून अधिक धरणं धोकादायक

राज्याच्या धरणाच्या सुरक्षेचं ऑडीट करणा-या धरण सुरक्षितता संघटनेचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.

Updated: Sep 2, 2016, 10:15 PM IST
राज्यातली 300 हून अधिक धरणं धोकादायक title=

नाशिक : राज्याच्या धरणाच्या सुरक्षेचं ऑडीट करणा-या धरण सुरक्षितता संघटनेचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. यात 300 हून अधिक धरणं धोकादायकतेच्या दुस-या टप्प्यात आहेत. यामध्ये टेमघर धरणाचाही समावेश आहे. 

सर्वात धोकादायक आणि असुरक्षित कोकणातील आंबेघर धरण आहे. राज्यात सध्या तारळी आणि टेमघर सर्वात धोकादायक असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. मात्र टेमघर आणि तारळी ही धरणं मात्र धोकादायकतेच्या दुसऱ्या श्रेणीत आहेत. 

टेमघर आणि तारळीसारखी आणखी 300 धऱणं राज्यात धोकादायकतेच्या दुसऱ्या श्रेणीत आहेत. धोकादायकतेच्या पहिल्या श्रेणीतही राज्यातली धरणं आहेत, मात्र त्याकडे दुर्लक्ष होतं आहे.