शिर्डीत गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ

साईंची शिर्डी म्हणून ओळख असलेल्या शिर्डीत आता गुन्हेगारी वाढत चाललीय. शिर्डी देशभरातील गुन्हेगारांचे आश्रय स्थान बनू लागलंय. दोन दिवसापूर्वी याठिकाणी नागरिकांवर चाकूहल्ला आणि गोळीबाराच्या घडल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांवर रोष व्यक्त केलाय. 

Updated: Mar 6, 2017, 01:45 PM IST
शिर्डीत गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ title=

शिर्डी : साईंची शिर्डी म्हणून ओळख असलेल्या शिर्डीत आता गुन्हेगारी वाढत चाललीय. शिर्डी देशभरातील गुन्हेगारांचे आश्रय स्थान बनू लागलंय. दोन दिवसापूर्वी याठिकाणी नागरिकांवर चाकूहल्ला आणि गोळीबाराच्या घडल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांवर रोष व्यक्त केलाय. 

आता पोलिसांनी कडक धोरण अवलंबण्यास सुरुवात केलीय. रात्री अकरा ते पहाटे पाच शिर्डीतील सर्व हॉटेल्स आणि इतर दुकानं बंद ठेवण्याची मोहीम पोलिसांनी सुरु केलीय. 

शिर्डीतील हॉटेल आणि इतर व्यवसाय अकरा नंतर चालू असल्यास पोलिसांच्या कार्यवाहीला सामोरे जावे लागणार आहे. मात्र, दुसरीकडे शिर्डीत भाविकांची वर्दळ दिवसा जास्त असते. 

याचवेळी विविध व्यवसायांच्या कारणामुळे गुन्हेगारी व्यक्तीचीही गर्दी असते. आता यावर पोलीस काय उपाय करतात ते पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.