छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

धुळे शहरात एका अल्पवयीन मुलीने युवकांकडून होत असलेल्या छेडछाडीला कंटाळून स्वतःला जाळून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कदायक घटना घडली आहे.

Updated: Mar 12, 2017, 05:35 PM IST
छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न  title=

धुळे : धुळे शहरात एका अल्पवयीन मुलीने युवकांकडून होत असलेल्या छेडछाडीला कंटाळून स्वतःला जाळून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कदायक घटना घडली आहे.

शहरातील एकता नगर मध्ये राहणाऱ्या सोळा वर्षीय मुलीने आपल्या घरातच अंगावर रॉकेल ओतून स्वतःला जाळून घेतले आहे. पिडीत तरुणीला उपचासारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  

या परिसरातच राहणाऱ्या मंतोष यादव हा तरुण सतत तिची छेडछाड करत त्रास देत होता. लग्नाबाबत मागणी करत वारंवार पाठलाग करायचा. सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळत पिडीत तरुणीने टोकाचं पाऊल उचलत स्वतःला जाळून घेतलय. तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून तीन जणांविरोधात देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.