पुणे : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र निर्माण प्राधिकरणतर्फे मुंबई बाहेरची पहिली सोडत अर्थात लॉटरी पुण्याच्या बालेवाडीत पार पडली. यावेळी विविध आर्थिक गटातल्या अनेक गरजूंना घराची सोडत लागलीये.
संपूर्ण संगणकीय पद्धतीनं झालेल्या या लॉटरीतून 2503 जणांना फ्लॅट मिळणार आहेत. त्याचबरोबर ६७ प्लॉट्सची लॉटरी ही यावेळी काढण्यात आलीये.
म्हाडा च्या योजनेमुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटातल्या अनेकांना घर मिळणार आहे... म्हाडाच्या घरांसाठी एकुण ३१,००० अर्ज आले होते. त्यातल्या या २५०३ जणांना घराची लॉटरी लागलीये