सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेची आत्महत्या

 सासरच्या सततच्या जाचाला कंटाळून महिलेनं आत्मत्या केल्याची घटना अलिबागमध्ये घडलीय. भारती सचिन बालघरे असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे.

Updated: Mar 16, 2016, 09:40 PM IST
सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेची आत्महत्या title=

अलिबाग : सासरच्या सततच्या जाचाला कंटाळून महिलेनं आत्मत्या केल्याची घटना अलिबागमध्ये घडलीय. भारती सचिन बालघरे असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे.

भारती हिचा विवाह चार वर्षांपूर्वी अलिबाग तालुक्यातल्या मांडवी इथे राहणा-या सचिन शंकर बालघरे याच्याशी झाला होता. सचिन बालगरे शिक्षक असून त्याचे वडीलही निवृत्त शिक्षक आहेत. लग्न होऊन चार वर्ष लोटल्यावरही मूल होत नसल्यानं, तसंच काही ना काही कारणांनी माहेराहून पैसे आणावेत म्हणून सासरच्या लोकांकडून तिचा छळ होत होता.

यासंदर्भात भारतीच्या माहेरच्या मंडळींनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र ही घटना अलिबागमध्ये घडल्यानं पुढील तपासासाठी ते अलिबाग पोलिसांकडे वर्ग करण्यात आलं आहे.