नाशिक, वाशिममध्ये आज मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन

कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ आज नाशिकमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करणायत आलंय. या मोर्चासाठी भगवे झेंडे लावून संपूर्ण शहर भगवामय केल गेलंय. 

Updated: Sep 24, 2016, 10:40 AM IST
नाशिक, वाशिममध्ये आज मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन title=

नाशिक : कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ आज नाशिकमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करणायत आलंय. या मोर्चासाठी भगवे झेंडे लावून संपूर्ण शहर भगवामय केल गेलंय. 

गेल्या महिनाभरापासून मोर्च्याची तयारीसाठी मराठा समाजातून गाव पातळीवर बैठकांच सत्र सुरु होतं. साधारणत १५ ते १६ लाख समाजबांधव मोर्चात सहभागी होतील असा दावा केला जातोय. यात महिला, तरुणींची संख्या लक्षणीय असणार आहे. तपोवानातून सुरु झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालायावर काढण्यात येणार आहे. 

गोल्फक्लब मैदानवर त्याची सांगता होणार आहे. शहरातील वाहतुकीच्या मारत बदल करण्यात आला असून काही शाळा महाविद्यालये बाजार समित्यांना सुट्टी घोषित करण्यात आलीय. शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आलाय. मोर्च्याच्या मार्गावर वाहन चालविण्यास परवानगी नाकारण्यात आली असून नो व्हेईकलझोन घोषित करण्यात आलेत. 

महिला आणि पुरुष मिळून एक हजारहून अधिक पोलीस कर्मचारी मोर्चावर नियंत्रण ठेवणार आहेत. तपोवनातून काढण्यात येणारा मोर्चा काट्या मारुती मंदिरा समोरून निमाणीमार्गे पंचवटी कारंजावर मोर्चा यणार आहे तिथून पुढे रविवार कारंजाहून महात्मा गांधी रोड वरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे. 

वाशिममध्ये मोर्चा

वाशीममध्येही मराठा मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपींविरूध्द तातडीने दोषारोपपत्र दाखल करून दोषींना फासावर लटकवावे. 

आत्महत्या केलेल्या मराठा समाजातील शेतक-यांच्या कुटुंबयांना नोकरीत समावून घ्यावं, ईबीसीची सवलत मर्यादा सहा लाखापर्यंत वाढवावी, ‘अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट’मधील  गंभीर बाबी काहीअंशी शिथिल करून कायद्यात सुधारणा करावी, यासह इतर विविध मागण्यांसाठी हा क्रांतीमोर्चा काढण्यात येणार आहे़.. 

राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणे वाशिम येथेदेखील अतिविराट मोर्चा काढून मराठा समाजाने एकजूटीची क्रांती घडवून आणावी. शांततेच्या मार्गाने निघणा-या या क्रांतीमोर्चात समाजातील आबालवृद्धांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.