नवी मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीये. मराठा समाजाला आरक्षण आणि न्याय मिळवून देण्यासाठी अण्णासाहेब पाटील यांनी स्वत:चं बलिदान दिलं.
राज्यातील मराठा समाजाचा मोठा भाग आज पाठीमागे राहिलाय त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे असं राज्य सरकारचं मत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. ते नवी मुंबईत बोलत होते.
राज्यभरात मराठा बांधवांचे मूक मोर्चे निघत असले तरी त्यांची गंभीर दखल राज्य सरकारनं घेतल्याचं ते म्हणाले. मी जेवढे दिवस मुख्यमंत्री राहिन तेवढे दिवस परिपर्तनासाठी काम करीन असंही ते म्हणाले.
कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी झालीच पाहीजे यासाठी हे प्रकरण उज्वल निकम यांच्याकडे दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. शिवाय मराठा समाजातील विद्यार्थ्यांना कौशल्यविकासाचं शिक्षण दिलं जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं.