मानसी देशपांडेला महिला दिनी मिळाला न्याय

२००९ साली झालेल्या मानसी देशपांडे हत्या प्रकरणी आरोपी जावेद खानला उच्च न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. चोरीच्या उद्देशानं घरात घुसलेल्या जावेद खाननं 11 जून 2009 रोजी 19 वर्षांच्या मानसी देशपांडेवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या केली आहे. 

Updated: Mar 8, 2016, 08:01 PM IST
मानसी देशपांडेला महिला दिनी मिळाला न्याय title=

औरंगाबाद : २००९ साली झालेल्या मानसी देशपांडे हत्या प्रकरणी आरोपी जावेद खानला उच्च न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. चोरीच्या उद्देशानं घरात घुसलेल्या जावेद खाननं 11 जून 2009 रोजी 19 वर्षांच्या मानसी देशपांडेवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या केली आहे. 

जावेदला तब्बल दीड महिन्यानं अटक झाली होती. पोलिसांनी त्याची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्टही केली होती. या खटल्यात सत्र न्यायालयानं जावेद खानला जन्मठेप दिली होती. मात्र उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान जावेदची शिक्षा वाढवून त्याला फाशीची शिक्षा सुनावली.