नागपूर : भर बाजारात आपल्या चप्पलमध्ये छुपा कॅमेरा लावून त्याद्वारे महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवणाऱ्या एका रोडरोमिओला नागरिकांनी चांगलाच धुतलाय.
संदीप हेडाऊ असं या ३० वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो एका खाजगी कंपनीत काम करतो. गेल्या अनेक दिवसांपासून त्याचं हे कारस्थान सुरू होतं.
रविवारी, संध्याकाळी त्याचा हाच प्रताप सुरू असताना काही नागरिकांना त्याच्या हालचालींचा संशय आला. आपला संशय पडताळून पाहण्यासाठी त्यांनी हुशारीनं 'चोर... चोर' असं ओरडणं सुरु केलं... त्याबरोबर संदीपनं पळायला सुरुवात केली आणि तो अलगद नागरिकांच्या या जाळ्यात सापडला.
त्याबरोबर नागरिकांना संदीपचा पाठलाग करत त्याला आपल्या ताब्यात घेतलं... आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. परंतु, संदीपचं दैव बलवत्तर म्हणून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी संदीपला खवळलेल्या नागरिकांच्या तावडीतून सोडवलं.
संदीप हेडाऊकडून छुपा कॅमेरा आणि काही व्हिडिओ जप्त करण्यात आलेत.