पुणे : जात पंचायतीच्या जाचाला कंटाळून एका रिक्षा चालकाने आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे.
अरुण किसन नायकू असं या रिक्षा चालकाचे नाव आहे. त्याला व त्याच्या कुटुंबाला लिंगायत गवऴी समाजाच्या जातीतून बहिष्कृत कऱण्यात आले होते. त्यानंतर जात पंचायतीने त्याला पुन्हा जातीत घेण्यास नकार दिला.
वेळोवेळी पाठपुरावा करुनही जातपंचायतीकडून प्रतिसाद मिळाला नाही. तसेच त्रास देणे सुरुच राहिल्याने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय.
पुण्यातील मुंढवा भागातील साईनाथ नगर भागात राहत होता. चंदननगर पोलिसांत याबाबत गुन्हा दाखल कऱण्याचे काम सुरु आहे. जातपंचायतीच्या पंचावर कारवाई होत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका कुटुंबियांनी घेतली आहे.