मुंबई : एकीकडे लोकशेडिंगचं संकट उभं ठाकलं असताना राज्य सरकारनं अपारंपारिक ऊर्जा निर्मितीसाठी कंबर कसलीय.
राज्यात येत्या पाच वर्षांत 14,400 मेगावॅट अपारंपरिक वीजनिर्मिती अपेक्षित असल्याचं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. पवनऊर्जा आणि ऊसाच्या चिपाडापासूनही वीजनिर्मिती करण्यात येईल.
विदर्भ आणि मराठवाडा सौर ऊर्जानिर्मितिचं हब असेल, असा प्रयत्न असल्याचंही ते म्हणाले. या प्रदेशात मोकळी जमीन, मुबलक प्रकाश आणि कोरडी हवा असल्यामुळे ते शक्य असल्याचं बावनकुळे म्हणाले.
काय आहे सरकारचं उद्दिष्ट?
सौरऊर्जा : 7500 मेगावॅट
पवनऊर्जा : 5000 मेगावॅट
उसाच्या चिपाडापासून वीज : 1000 मेगावॅट
जलविद्युत : 400 मेगावॅट
कृषी अवशेषांपासून वीज : 300 मेगावॅट
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.