सेनेच्या बबनराव घोलपांवर आजन्म निवडणूक बंदी

शिवसेनेचे देवळालीचे विधानसभा सदस्य आणि माजी मंत्री बबनराव घोलप यांचं ‘राजकारण’ संपुष्टात येण्यीच चिन्ह आहेत. घोलप यांच्यावर आजन्म निवडणूक बंदी घालण्यात आलीय.

Updated: Aug 23, 2014, 10:44 AM IST
सेनेच्या बबनराव घोलपांवर आजन्म निवडणूक बंदी title=

मुंबई : शिवसेनेचे देवळालीचे विधानसभा सदस्य आणि माजी मंत्री बबनराव घोलप यांचं ‘राजकारण’ संपुष्टात येण्यीच चिन्ह आहेत. घोलप यांच्यावर आजन्म निवडणूक बंदी घालण्यात आलीय.

बबनराव घोलप यांना अपात्र घोषित करणारा आदेश राज्यपाल के. शंकरनारायण यांनी जारी केलाय. भ्रष्ट्राचार प्रतिबंधक कायद्यान्वये तीन वर्षांचा कारावास आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षाही त्यांना ठोठावण्यात आलीय.

त्यामुळे, घोलप यांचे सध्याचे आमदारपद 21 मार्च 2014 पासून पूर्वलक्षी परिणामाने संपुष्ठात आलंय. इतकंच नाही तर भविष्यात त्यांना संसदेची किंवा राज्य विधिमंडळाची कोणतीही निवडणूक लढवता येणार नसल्यानं त्यांचं राजकीय जीवन संपुष्ठात आलंय.

बेहिशोबी मालमत्तेचा फटका...

21 मार्च रोजी बबनराव घोलप यांना उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्या प्रकरणी माझगावच्या सेशन कोर्टाने दोषी ठरवले असून त्याला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. घोलप आणि त्यांच्या पत्नीला या प्रकरणात तीन वर्षाची सक्तमजुरी आणि 1 लाखांचा दंड सुनावला आहे.

तत्कालीन युती सरकारमध्ये समाजकल्याण मंत्री असताना घोलप यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई सेक्रेटरी मिलींद यवतकर यांनी सत्र न्यायालयात तक्रार दाखल केली होती. घोलप यांनी १९९९ मध्ये महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ व चर्मोद्योग महामंडळात गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. घोलप यांच्या मालमत्तेत मंत्री झाल्यावर मोठी वाढ झाली होती. या चार महामंडळातील आठ कोटी रुपयांची ठेव बुडित गेलेल्या अवामी को. ऑप. बँकेत गुंतविण्यात आली होती. घोलप आणि त्यांची पत्नी शशिकला यांच्या नावावर बेहिशेबी मालमत्ता असल्याचा यवतकर यांनी आरोप केला होता.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.