मुरबाड - बिबट्याची दहशत जेरबंद, गावकऱ्यांनी सोडला श्वास

मुरबाड तालुक्यात गेल्या १५ दिवसांपासून दहशत बसविणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर वनविभागाला यश आले आहे.  बकऱ्या आणि कुत्री यांना बिबट्याने फस्त केले होते. 

Updated: Aug 8, 2015, 03:54 PM IST
मुरबाड - बिबट्याची दहशत जेरबंद, गावकऱ्यांनी सोडला श्वास title=

पालघर : मुरबाड तालुक्यात गेल्या १५ दिवसांपासून दहशत बसविणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर वनविभागाला यश आले आहे.  बकऱ्या आणि कुत्री यांना बिबट्याने फस्त केले होते. 

रात्रीच्या सुमारास साखरे गावातील  मदन चिंतामण पवार यांच्या  घरात घूसुन बिबटयाने चार बकऱ्या ठार केल्या होत्या. नंतर बिबट्याने आपला मोर्चा  किसळ गावतील काशिनाथ पावर यांच्या फार्म हाउसमध्ये वळवला. बिबट्या फार्म हाउस दडून बसल्याचे संजय पडवळ या इसमाने पाहताच त्याने दाराची कडी लाऊन घेतली आणि  बिबट्याला कोढूंन ठेवेले.

याबाबत माहिती त्यांनी वन विभागाला कळविली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्री १२ वाजताच्या सुमारास त्या बिबट्याला भूलचे इंजेक्सन देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर त्याला  जेरबंद करून त्याची रवानगी मुबईच्या संजय गांधी उद्यानात करण्यात आली. मात्र १५ दिवस दहशती खाली असलेल्या मुरबाड करांनी अखेर सुटकेचा नि:श्वास  सोडला 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.