नाशिक : लासलगावाच्या बाजारात आज कांद्याचा भाव पडलाय. क्विंटल मागे साधारण आठशे रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे.
दोन दिवस बाजार बंद असल्यानं कांद्याची आवक वाढलीय. त्यामुळे कांद्याचा जास्तीज जास्त भाव ५ हजार ४९० रूपये , राहिलाय.शनिवारच्या तुलनेत हा भाव क्विंटलमागे आठशे रुपयांनी कमी आहे. लासलगावात सरसरी भाव ४ हजार ८०० रूपये तर कमीतकमी भाव २ हजार ५०० रूपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय.
कांदा सध्या सगळ्या देशात चर्चा विषय ठरतोय. कडाडलेल्या कांद्यामागे नेमकं कारण काय असा प्रश्न आता विचाराला जाऊ लागलाय. सरकारच्या मते कांद्याचा भाव वाढण्यामागे साठे बाजी हे एक मोठं कारण आहे. तिकडे व्यापारी मागणी आणि पुरवठ्याचं गणित चुकल्याचं म्हणातयत.
झी मीडियाचं सहकारी वृत्तपत्र डीएनएच्या माहितीनुसार यंदा ऑगस्ट महिन्यात लासलगावच्या कांदा बाजारातली आवक ८० टक्क्यांनी कमी झालीय. त्यामुळे कांद्याचा भाव वाढणं स्वाभाविक आहे. बाजारात गेल्या वर्षी अडीच लाख टन कांद्याचा पुरवठा झाला होता.
यंदा मात्र हा पुरवठा फक्त ५० हजार टनापर्यंत पोहचलाय. दररोज फक्त २ हजार टन कांदा बाजारात येतोय. आशियातल्या सर्वात मोठा घाऊक बाजार लासलगावात भरतो. त्याच बाजारात कांद्याची आवक घटल्यानं भाव वाढणं स्वाभाविक असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.