भूमाफियांना दणका, 150 अवैध झोपड्या जमीनदोस्त

अनेकांच्या जमिनी बळकावलेला भूमाफिया ग्वालबंशीच्या मुसक्या आवळण्यास प्रशासनाने सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अवैध बांधकाम पाडण्यात येत आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 10, 2017, 11:38 AM IST
भूमाफियांना दणका, 150 अवैध झोपड्या जमीनदोस्त title=

नागपूर : अनेकांच्या जमिनी बळकावलेला भूमाफिया ग्वालबंशीच्या मुसक्या आवळण्यास प्रशासनाने सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अवैध बांधकाम पाडण्यात येत आहेत.

भूमाफिया ग्वालबंशी परिवाराने कब्जा केलेल्या कोराडी मार्गावरील शिवकृष्णधाम येथील अवैध बांधकाम पाडण्यास सुरूवात केली. ग्वालबंशीने 7 एकरच्या परिसरात तब्बल 150 अवैध झोपड्या वसवल्या होत्या. 

मात्र ग्वालबंशी विरूद्ध पोलिसांत तक्रारी आल्यावर जिल्हा प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने अवैध बांधकाम हटविण्यास सुरूवात केलीय.