मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहनानं कुंभपर्वाला सुरुवात

नाशिक आणि त्रंबकेश्वरला आज सकाळी ध्वजारोहण झालं. सकाळी ६ वाजून १६ मिनिटांनी गुरु सिंह राशीत प्रवेश करण्याच्या मुहूर्तावर ध्वजारोहणाने खऱ्या अर्थाने कुंभपर्वाला सुरूवात झाली. 

Updated: Jul 14, 2015, 10:40 AM IST
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहनानं कुंभपर्वाला सुरुवात title=

नाशिक : नाशिक आणि त्रंबकेश्वरला आज सकाळी ध्वजारोहण झालं. सकाळी ६ वाजून १६ मिनिटांनी गुरु सिंह राशीत प्रवेश करण्याच्या मुहूर्तावर ध्वजारोहणाने खऱ्या अर्थाने कुंभपर्वाला सुरूवात झाली. 

सुरक्षेसाठी संपूर्ण नाशकात चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. अधिक मासा निमित्ताने रामकुंड परिसरात भाविकांनी स्नानासाठी एकच गर्दी केली. नाशकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्या उपस्थित नाशकात ध्वजारोहण झालं तर, त्र्यंबकेश्वरमध्ये केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग आणि पंकजा मुंडे यांच्या हस्ते पुजाविधी, सिंहस्थ कुंभमेळाची शानदार सुरुवात झालीय.

दरम्यान, नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वसंध्येला धर्मध्वज शोभायात्रेला काढण्यात आलीय. काळाराम मंदिरापासून ही शोभायात्रा सुरू झाली. ती पुढं रामकुंडापर्यंत नेण्यात आली आणि तिथंच शोभायात्रेचं विसर्जन झालं. डोक्यावर कलश घेऊन शेकडो महिला तसंच पारंपारितक वेषातली पुरूष मंडळी या शोभायात्रेत सहभागी झाली होती.

नाशिकमध्ये आज ध्वजारोहण झालं असलं तरी खरा कुंभ १९ ऑगस्टपासून होणार असल्याचं ग्यानदास महाराजांनी स्पष्ट केलंय. १९ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरपर्यंत स्नानाचं महत्त्व असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, कुंभमेळ्यासाठी रेल्वे सुरु करण्यालाही ग्यानदास महाराजांनी आक्षेप घेतलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.