रत्नागिरी, सिंधुदुर्ग : कोकणात तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावासानं शनिवारी उसंत घेतली. मात्र, जोरदार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरचे रस्ते निसरडे झालेत. त्याचवेळी धुकं आणि पाऊस यामुळे गाड्या चालवताना अडचणी येताहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रत्नागिरी, संगमेश्वर, देवरुख, लांजा, राजापूर, खेड आदी तालुक्यांत जोरदार पाऊस पडत आहे. येथील नद्या काठोकाठ भरून वाहत आहेत.
पावसामुळे सिंधुदुर्गातल्या महामार्गावर झाडं उन्मळून पडल्यानं, मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक धिम्या गतीनं सुरु आहे. तर जोरदार पावसामुळे नदीनाल्यांची पातळी वाढलीय. दरम्यान गावांना सतर्कतेचा इशारा – भुस्खलन होणा-या जिल्हा प्रशासनाने नोटिसा दिल्या आहेत. मच्छिमारीही करण्यास छोट्या होड्यांना मनाई करण्यात आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.