सोलापूर पोलीस ठाण्यात हाणामारी

सदरक्षणाय खलानिग्रहणायचा संदेश देणाऱ्या पोलीस खात्यातील दोन अधिकाऱ्यांनी बेशिस्त वर्तन केलंय. दरम्यान, पोलीस ठाण्यात त्यांनी मारामारी केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. 

Updated: Jun 20, 2015, 08:48 AM IST
सोलापूर पोलीस ठाण्यात हाणामारी title=

सोलापूर : सदरक्षणाय खलानिग्रहणायचा संदेश देणाऱ्या पोलीस खात्यातील दोन अधिकाऱ्यांनी बेशिस्त वर्तन केलंय. दरम्यान, पोलीस ठाण्यात त्यांनी मारामारी केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. 

एका मटकाबुकीवर कारवाई करण्यावरून आधी शाब्दिक चकमक आणि त्यानंतर झालेल्या हाणामारीमुळे सोलापूर पोलीस खात्यात एकच खळबळ उडालीय. जोडभावीपेठ पोलीस ठाण्याचे पीएसआय गंगाधर जोगदनकर आणि सपोनि चंद्रकांत माळी यांच्यात झालेल्या या हाणामारीत फौजदार जोगादानाकार यांचा चष्मा फुटला असून त्यांच्या डोळ्याला इजा झालीय. 

सध्या जोगदधनकर यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे, याबाबत वरिष्ठ अधिकारी चौकशी करीत असून संबंधितांवर कडक कारवाई करणार असल्याचं सांगितलय.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.