कोल्हापुरात पद्मावती सिनेमाचा सेट जाळला

संजय लीला भन्साली यांच्या पद्मावती सिनेमाच्या शुटिंगला कोल्हापुरातही विरोध होत आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 15, 2017, 09:33 AM IST
कोल्हापुरात पद्मावती सिनेमाचा सेट जाळला title=

कोल्हापूर : संजय लीला भन्साली यांच्या पद्मावती सिनेमाच्या शुटिंगला कोल्हापुरातही विरोध होत आहे.  आज बुधवारी पहाटे २ वाजता सिनेमाचा सेट जाळण्यात आला आहे. राजस्थानात पद्मावती सिनेमाच्या शुटिंगला विरोध झाल्यानंतर, कोल्हापुरातील मसाई पठारावर सिनेमाचं शुटिंग सुरू करण्यात आलं होतं. 

मात्र या पठारावर उतरतीच्या बाजूने ५० ते ५० जणांनी येऊन, सेटची जाळपोळ केली, सेटवर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आल्याने सेटला आग लागली. यावेळी या जमावाने सेटच्या बाजूला उभ्या असलेल्या वाहनांचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड केली.

सेटची तोडफोड झाल्यानंतर सकाळी घटनास्थळी पोलिस पोहोचले आहेत. पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने आरोपींचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, त्यामुळे आरोपी नेमके कोणत्या दिशेने पळाले आणि कोण होते, याचा शोध लागण्यास मदत होणार आहे.