कोल्हापूरच्या महापौरपदाची आज निवडणूक

करवीरनगरीचा महापौर कोण?, हे आज स्पष्ट होणार आहे. मात्र काँग्रेसच्या अश्विनी रामाणे या महापौरपदी विराजमान होण्याची शक्यता वाढणार आहे.

Updated: Nov 16, 2015, 09:26 AM IST
 कोल्हापूरच्या महापौरपदाची आज निवडणूक title=

कोल्हापूर : करवीरनगरीचा महापौर कोण?, हे आज स्पष्ट होणार आहे. मात्र काँग्रेसच्या अश्विनी रामाणे या महापौरपदी विराजमान होण्याची शक्यता वाढणार आहे.

बहुमत सिद्ध करण्यासाठी ४१ आमदार लागतात. अश्विनी रामाणे य़ांना काँग्रेस-राष्ट्रवादी मिळून ४४ सदस्य आहेत, शिवाय तीन अपक्षांनीही पाठिंबा दिला आहे.

भाजपाच्या सविता भालकर यांच्याकडे सध्य़ा ३२ नगरसेवक आहेत, तसेच भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी घोडेबाजार करणार नसल्याचं म्हटलं आहे. तरीही तोडफोडीचं राजकारण टाळण्यासाठी भाजपने ३२ नगरसेवकांना व्हीप जारी केला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.